pune news : खडकी शिक्षण संस्था द्वारा संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी १४ वा राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. तो दिवस २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगितले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की “सक्षम सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करने आवश्यक आहे”.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की “मतदार हा राष्ट्र निर्माता असतो कारण त्याने निवडून दिलेले सरकारच देशाचा कारभार करत असते”. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय मतदार दिना निमित्त दिलेला संदेश लाईव्ह दाखविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांची आॅनलाईन नवमतदार नोंदणी करण्यात आली.
याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सर्व मतदाराना आपल्या कर्तव्याची शपथ देण्यात आली. या प्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे संचालक रमेश अवस्थे, सर्व उपप्राचार्य प्रा शेलार, मुसमाडे ,प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव आनंदजी छाजेड यांनी मानले तर सूत्रसंचालन अविनाश कोल्हे यांनी केले. यावेळी नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा लेले यांनी टी जे एफएम ८९.६ या वाहिनीवरून या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.