पुणे : तो ७० वर्षाचा. तर ती ६५ वर्षाची एकाच घरात राहतात. मात्र, दोघे एकमेकांना बोलतही नाहीत. स्वतंत्र्यपणे स्वयंपाक करून खायचे. दोघातील वाद इतके विकोपाला गेले. तिने थेट न्यायालयात धाव घेतली. पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला.
लोकअदालतमध्ये समुपदेशामध्ये उतार वयात दोघांना एकामेकांची गरज असल्याचे समजावून सांगण्यात आले. दोघे वाद विसरून एकत्र आले. तो माजी सैनिक होता त्याने अश्रू वाहत न्यायधीश साहेबांना सलूट केले.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो माजी सैनिक, तर ती गृहिणी आहे. त्याच्या वतीने न्यायालयात अॅड. सचिनकुमार गेलडा यांनी, तर तिच्या वतीने अॅड. अनिलकुमार जाधव यांनी बाजू मांडली.
तो व्यवस्थित पालनपोषण करीत नाही, असा तिचा आरोप होता. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून दोघात वाद होता. यामुळे दोघे एकमेकांना बोलत नव्हते. अगदी स्वयंपाकही एकाच घरात वेगवेगळा करत असत.
दोघातील वाद विकोपाला गेल्यामुळे तिने फेब्रुवारीमध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. यात मेटेनन्सही मागितला होता. हा दावा लोकअदालतमध्यी ठेवण्यात आला. दोघात यशस्वी समुपदेश झाले. त्याने दरमहा तिला आठ हजार रुपये द्यायचे, याशिवाय जमेल तसे पैसे द्यायचे आणि तिचा व्यवस्थित सांभाळ करण्याचे ठरले.
उतार वयात दोघांना एकामेकांची गरज आहे. राहिलेले आयुष्य एकामेकांसोबत गुण्या गोविंदाने राहण्याचे दोघांना समुपदेशनात सांगण्यात आले. दोघे एकमेकातील वाद विसरले. नव्याने जगण्यास सुरूवात केली.
– अॅड. सचिनकुमार गेलडा आणि अॅड. अनिलकुमार जाध