Vanchit Bahujan Aaghadi Candidate List – वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरे यांना (Vasant More) उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रस शरदचंद्र पवार सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. आधीही वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. आता वंचितच्या वतीने वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
वंचितचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार –
नांदेड – अविनाश बोसिरकर
परभणी- बाबासाहेब उगळे
छत्रपती संभाजीनगर – अफसर खान
पुणे – वसंत मोरे
शिरूर – मंगलदास बागूल
हिंगोली – डॉ. बी.डी. चव्हाण
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारसकर
सातारा – मारुती धोंडीराम जानकरधुळे – अब्दुल रहमान
हातकणंगले – दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटीलरावेर – संजय पंडीत ब्राम्हणे
जालना – प्रभाकर देवमन बकले
मुंबई उत्तर मध्य – अबुल हसन खान
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी