पुणे – शहरातील कोरेगाव पार्क परिसर निवासी सदनिका घेण्याच्या दृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. उच्चभ्रू वस्तीच्या डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्याने महागड्या वास्तूंमध्ये दुसरे स्थान यंदाही कायम ठेवले आहे. कोरेगाव पार्कमधील रेडी रेकनकरचा दर प्रती चौरस मीटरसाठी 1 लाख 72 हजार 580 रुपये, तर प्रभात रोडवरील सदनिकांचा दर 1 लाख 54 हजार रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे.
महापालिका क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहारांसाठी नवे रेडी रेकनरचे दर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते शुक्रवारपासून लागू करण्यात आले आहे. पुणे शहरात सरासरी 8.15 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. या परिसरांत मागील दोन वर्षात झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला.