पुणे सर्वोत्कृष्ट “स्मार्ट सिटी’

पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’चा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर दक्षिण दिल्ली महापालिकेसह पुणे स्मार्ट सिटीने संयुक्‍तपणे स्मार्ट सिटी एसपीव्ही’ पुरस्कारही मिळविला आहे.

नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 22 ते 24 मे या दरम्यान स्मार्ट सिटी एक्‍सपो 2019’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये पुणे स्मार्ट सिटीला विजेते घोषित करण्यात आले. तसेच, स्मार्ट सिटीला एसपीव्ही’ पुरस्कारही घोषित करण्यात आला. या पुरस्कारांसाठी श्रेण्यांसाठी देशभरातील वेगवेगळ्या शहरांची नामांकने करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)