पुणे – आठ दिवसांत दाखल झाले 45 हजार अर्ज

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी आठ दिवसांत एकूण 45 हजार 736 अर्ज दाखल झाले आहेत.

प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी 27 मे पासून संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. दहावीच्या निकालानंतर अर्जाचा भाग 2 विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत दाखल झालेल्या अर्जांपैकी 12 हजार 172 अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. 17 हजार 558 अर्जांची स्वयंचलित पडताळणी झाली आहे. 16 हजार 6 अर्जांची अद्याप तपासणी पूर्ण करण्यात आलेली नाही.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी एकूण 45 हजार 273 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 5 हजार 149 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. 24 हजार 471 अर्जांची संगणकाद्वारे आपोआपच तपासणी पूर्ण झाली आहे. 15 हजार 703 अर्जांची तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागात 1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. नाशिकमध्ये 4 हजार 12 अर्ज दाखल झाले असून यातील 1 हजार 193 अर्जांची तपासणी झाली आहे. 957 अर्जांची आपोआप तपासणी झाली असून अद्याप 1 हजार 862 अर्जांची तपासणी होणे बाकी आहे. अमरावती विभागात केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. औरंगाबादमध्ये 369 अर्ज दाखळ झाले असून 42 अर्जांची तपासणी झाली आहे. 246 अर्जांची स्वयंचलित तपासणी झाली आहे. 63 अर्जांची तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.