काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर प्रेम व्यक्त करणारी अभिनेत्री माहिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या माहिकाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून तिला युझर्सने चांगलेच ट्रोल केले आहे. या फोटोमध्ये माहिका फुटपाथवर झोपली आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये माहिका शर्माने म्हंटले कि, जेव्हा घर लांब असेल आणि तुम्हाला आराम करावासा वाटत असेल. अंदाज अपना अपना, रास्तों पे रहना पसंद है मुझे, असे तिने लिहले आहे. हा फोटो पोस्ट करताच युझर्सने चांगलेच तिला फैलावर घेतले. एका युझरने लिहले कि, सलमान खानपासून स्वतःचा बचाव करून राहा. तर आणखी एकाने लिहले कि, जेव्हा राहुल गांधींना समर्थन देतात.
https://www.instagram.com/p/ByKoo6_JDvf/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, याआधी माहिका शर्माने राहुल गांधींचा एका फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केले होते. तसेच सोशल मीडियावर माहिकाने पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसाठीही प्रेम व्यक्त केले होते. माहिका अनेकदा आपल्या फोटोंमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असते.