मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ‘पायल रोहतगी’ गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आहे. पायलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘राजा राममोहन रॉय’ यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मात्र, पायलने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी तिने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केली. पायलने आपल्या ट्विटर अकाउंटवरून “छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शूद्र जातीत झाल्याचं” म्हंटल आहे. त्यामुळे या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे. तिच्या पोस्टमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
chhatrapati shivaji maharaja was born in #shudra varna in family of farmers & by sacred thread ceremony & remarriage to his spouse made a #kshtriaya so that he could be coronated #King? So people from 1 Varna could go 2 another Varna if they acquired that skill ? NO casteism ? pic.twitter.com/AKBjvHJ1SI
— PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM (@Payal_Rohatgi) June 1, 2019
दरम्यान, वृत्त वाहिनीच्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल हात जोडून माफी मागितली आहे. तसेच हा माफीचा व्हिडियो सोशल माध्यमांमध्ये शेअर केला आहे. या माफीच्या व्हिडीओमध्ये तिने म्हटले आहे की,’मी केलेल्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला फक्त शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाचलेली एक माहिती सोशल मीडियावर टाकली. शिवाजी महाराजांबद्दल मी वाचण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी माफी मागते. मी व्यक्त होण्याचा प्रयत्न केला पण भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ नावापुरते आहे हे मी विसरले होते.’ असंही ती व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.