बारामती – बारामतीच्या युवकाने मागील महिन्यात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त चक्क दुचाकीवर 4 मिनिटे 20 सेकंदात 10 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला. रोहित दिलीप शिंदे असे या धाडसी युवकाचे नाव आहे. त्याची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. चालू दुचाकीवर 10 वेळा सूर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला मोटार सायकल “रायडर’ ठरला आहे. तो वयाच्या 16 वर्षांपासून दुचाकी शर्यत करीत आहे.
12 वर्षांपासून मोटार सायकल रायडींग करून आतापर्यंत 300 हून मोटरसायकल रायडिंग शो भारतात केले आहेत. मोटार सायकल रायडींग करण्याचा छंद हा स्वत:पुरता मर्यादित राहिलेला नसून त्याने अनेक युवकांना मोटार सायकल रायडींगचे प्रशिक्षण देण्यास सुरू केले आहे. मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडींग ऑफ रोडींग, ऑटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे.
नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकीक केला. देशातील 70 रायडरने भाग घेतला होता. 390 सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणाऱ्या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पधेर्साठी रोहितची निवड झाली आहे. यात प्रथम दहामध्ये येणाऱ्यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे, असे बजाज ऑटोचे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले आहे.