अवसरी -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री खंडोबा महाराज यात्रेनिमित्त शनिवारी (दि. 18) आणि रविवारी (दि. 19) भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीसाठी 1 लाख 75 हजार रुपये रोख इनाम असून, फायनलसाठी दोन मोटरसायकल, चार फ्रिज, चार टीव्ही बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यतीला इनाम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. होणाऱ्या या शर्यतींच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फळीफोडसाठी रोख दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. घाटाचा राजा पंधरा हजार रुपये, वीस फुटावरून कांडे दहा हजार रुपये, तसेच आकर्षक बारीसाठी पाच हजार रुपये इनाम दिला जाणार आहे.
याचप्रमाणे घोड्याच्या शर्यतीसाठी प्रथम क्रमांक अडीच हजार रुपये, द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. दोन्ही दिवशी फायनल होणार आहे, त्यासाठी प्रथम क्रमांक दोन टू व्हीलर, व्दितीय क्रमांक आठ फ्रिज, तृतीय आणि चौथा क्रमांक आठ टीव्ही भेट दिले जाणार आहेत.
या शर्यतींसाठी टोकण वाटप सोमवारी (दि. 13) सकाळी अवसरी खुर्द येथे होणार असून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. टोकन फी तीन हजार रुपये आहे. बैलगाडा शर्यतीसाठी लकी ड्रॉ पद्धतीने टोकन होईल निमंत्रित 300 बैलगाडे पळविण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.