बारामती/ जळोची -बारामती शहर पोलिसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या कारवर छापा टाकत 4 लाख 24 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील कदम चौकात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शंकर उर्फ अक्षय राजू धोत्रे,नागे संतोष दावड (दोघे रा. पतंग शाह नगर) यांना अटक करण्यात आली. तर आतिश राजू धोत्रे हा फरार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कदम चौक या ठिकाणी एका सिल्व्हर रंगाच्या कारमध्ये विक्रीसाठी आणलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांच्या तपास पथकाने छापा मारला असता कारमध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये वेगवेगळ्या ब्रॅंडचा गुटख्यांच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी येथील गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान तपासले असता त्या दुकानात सुद्धा गुटखा व टॅंगो दारूच्या क्वॉटर मिळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 24 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई अक्षय सिताप, दशरथ इंगोले, पोलीस हवालदार शिंदे यांनी केली.