सविंदणे, (वार्ताहर)- सविंदणे येथे श्री गुरुदेव दत्त विद्यालयात महिला दिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच विविध कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येतात.
अध्यक्षस्थानी शिरूरचे एपीआय अमोल पन्हाळकर होते. कार्यक्रमासाठी सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच नंदा पुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राठोड, ह.भ.प. गंगाराममहाराज पडवळ, माजी सरपंच सोनाली खैरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नरवडे, वैशाली नरवडे, सीताताई पडवळ, ज्योती ढोबळे, सूर्यवंशी सिस्टर, सीआरपी अश्विनी झेंडे, शाळा समितीचे अध्यक्ष अर्जुन लंघे, बाळासाहेब पडवळ, विठ्ठल पडवळ, माऊली पुंडे, मुख्याध्यापक सखाराम पुंडे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सरपंच शुभांगी पडवळ, बाळासाहेब पडवळ, गंगाराममहाराज पडवळ, सोनाली खैरे, पुंडे सर, दुसाने सर व दुसाने मॅडम यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामधील विविध प्रसंग, आपल्या धर्मासाठी व स्वराज्यासाठी केलेले बलिदान याविषयी माहिती सांगितली.
सरपंच शुभांगी पडवळ यांनी सविंदणे गावाचा झालेला विकास, राबवलेल्या शासनाच्या विविध योजना व विद्यालयाची होत असलेली प्रगती याविषयी माहिती सांगितली. ह.भ.प.गंगाराम महाराज पडवळ, अमोल पन्हाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राठोड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने व ईश्वरी लंघे यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश दुसाने यांनी आभार मानले.