पुणे : वन विभागाकडून वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी उघडकीस; तस्करी करणारी टोळी जेरबंद

पुणे – वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांचेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या टाेळीस पुणे वनविभागाचे पथकाने जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून एका बिबट्याची व दाेन वाघाची कातडी, दाेन कार, एक दुचाकी जप्त केल्याची माहिती पुणे विनविभागाचे उपवनसरंक्षक राहूल पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी अनिकेत प्रमाेद भाेईटे (वय-२०), संदिप शंकर लकडे (३४), धनाजी नारायण काळे (३५) यांना वारजे परिसरात अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आराेपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासवड बसस्थानक येथे वाघाची व बिबटयाची कातडी तस्करी करणाऱ्यास आलेल्या टाेळीस, वन विभागाचे पथकाने बनावट गिऱ्हाईक बनवून माहितीची खातरजमा करत सापळा रचून दाेन कार मधील पाचजणांना अटक केली आहे.

शरद इंगाेले (४७), बाळू बापू नामदास (६५),अकाश आणासाहेब रायते (२७), उदयसिंह शंकरराव सावंत (४७) व अमाेत रमेश वेदपाठक (३४) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्या ताब्यातून दाेन वाघाची व एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई सहा.वनसंरक्षक मयुर बाेठे, आशुताेष शेंडगे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल, वैभव बाबर, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव  चव्हाण, रईस माेमीन, परमेश्वर वाघमारे, याेगेश तिकाेळे, अमाेल गुरव, अमाेल साठे यांचे पथकाने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.