पुणे – शहर परिसरात थंडीचा कडाका कायम असून, अधून मधून कडक ऊन पडते तर मध्येच ढगाळ वातावरण निर्माण होत आहेत. येत्या 24 तासांत शहरात असेच संमिश्र वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर मात्र हवामान कोरडे राहून थंडीत वाढ होईल, असा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
उत्तरेकडील राज्यांतील काही भागांमध्ये सुरू असलेल्या थंडीचा लाटेचा प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडी जाणवत आहे. तर दुसरीकडे दक्षिण कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने पुण्यासहित मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. परिणामी, संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. शहरात रविवारी कमाल-26.5, तर किमान तापमान 12.1 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.