पुणे (अभिराज भडकवाड) –गेल्या निवडणुकीतील प्रभाग क्र.7, 8 व प्रभाग क्र. 9 मिळून प्रभाग क्र. 12 औंध-बालेवाडी तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक वगळता इतर सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 12 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा तयारी करत आहेत. परंतु, तीन तिकीटांसाठी भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची यादी मात्र बरीच मोठी असल्याने अनेकांच्या नावांना कात्री लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या औंध व बालेवाडी हा भाग जास्त अंतराचा असल्यामुळे सर्व पक्षांना बालेवाडी परिसरातून एक, औंध परिसरातून
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
प्रभागातील 150 पेक्षा अधिक सोसायटी टॅंकरमुक्त केल्या. केंद्राच्या योजनेअंतर्गत प्रभागात 4.5 कोटी लिटर क्षमतेच्या एकूण आठ टाक्या उभारल्या. 150 कि.मी.पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या विकसित केल्या. “क्विक रिस्पॉन्स टीम’या संकल्पनेतून समस्या सोडविण्यावर भर दिला.अमोल बालवडकर (भाजप)
बालेवाडी येथील स्मशानभूमीचे काम, महानगरपालिकेची शाळा, बालेवाडी येथील हाय स्ट्रीट सिंमेट रस्ता, बालेवाडी येथील क्रिडांगण, पाण्याची टाकी हे प्रकल्प पूर्ण केले. बालेवाडी येथे आर.के.लक्ष्मण कलादालनाचे काम सुरू केले. ई-लर्निग स्कूलचे काम सुरू केले.बाबुराव चांदेरे (राष्ट्रवादी)
बाणेर मुख्य रस्त्याला कोठेही स्वच्छतागृह नव्हते, त्यामुळे मुख्य रस्त्याला कपिल मल्हार सोसायटी समोर स्मार्ट स्वच्छतागृह उभारले. बाणेर-बालेवाडी परिसरातील सोसायटीधारक नागरिकांच्या मागणीवरून परिसरात एमएनजिएल गॅसलाइनसाठी प्रयत्न. ताम्हाणे चौकात सुसज्ज क्रीडा उद्यान.स्वप्नाली सायकर (भाजप)
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बनविले. डीपी रोड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह उभारले. ब्रेमन चौक येथे चिल्ड्रन्स पार्कची निर्मिती. परीहार चौक येथे वाहनतळ विकसित करण्यात आले. पालिकेच्या इंदिरा गांधी शाळेत विकासकामे केली.अर्चना मुसळे (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडीकडे दुर्लक्ष केले कोणत्याही प्रकारची कामे या परिसरामध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून करण्यात आलेली नाहीत.प्रमोद निम्हण (राष्ट्रवादी )
विद्यमान राष्ट्रवादीचे नगरसेवक हे ज्येष्ठ नगरसेवक असून सुद्धा त्यांनी पाच वर्षांमध्ये प्रभागाकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये त्यांच्याकडून आश्वासनांची खैरात वाटण्यात येत आहे. नागरिकांच्या हिताची कुठलीही विकासकामे झालेली नाहीत.राहुल कोकाटे
(भाजप)
करोना विषाणूच्या साथीमध्ये कमी प्रमाणात निधी मिळाल्यामुळे भाजपच्या प्रतिनिधींना विकास कामे करण्यावर मर्यादा आल्या, त्यामुळे हवे त्या प्रमाणात कामे करता आलेली नाहीत. नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास भविष्यातही नियोजनबद्ध विकासकामांवर भर दिला जाईल.विद्या बालवडकर
सध्याच्या नगरसेवकांनी केलेली कामे समाधानकारकच म्हणावी लागतील. स्मार्ट सिटी तर्फे देखील औंध परिसराचा विकास झाला आहे. या 25 वर्षात माझ्या माध्यमातून झालेल्या विकासकामामुळे यंदा निश्चितच मतदार मला पुन्हा निवडून देतील.संगीता गायकवाड (राष्ट्रवादी)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजपा : अमोल बालवडकर, लहू बालवडकर, स्वप्नाली सायकर, अर्चना मुसळे, सनी निम्हण, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब रानवडे, विशाल गांधीले, अभिजित गायकवाड, प्रकाश बालवडकर, सचिन वाडेकर, मोरेश्वर बालवडकर, नितीन रनवरे. राष्ट्रवादी कॉंग्रेस : बाबूराव चांदेरे, अशोक मुरकुटे, सागर बालवडकर, शिला भालेराव. कॉंग्रेस : कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, जीवन चाकणकर, रोहित धेंडे, मीना गायकवाड. शिवसेना : डॉ. दिलीप मुरकुटे, सुशील लोणकर, नाना वाळके. मनसे : अनिकेत मुरकुटे, शशिकांत घोडके, दत्ता रणदिवे, निलेश जूनवणे,अमर अडागळे. आरपीआय : परशुराम वाडेकर, रमेश ठोसर. इतर इच्छुक : अविनाश कांबळे, विकास रानवडे.