पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे अतिक्रमण विरोधी कारवाई केली. शुक्रवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन मजली इमारत व हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले.
पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड पोलीस व वाहतूक पोलीस यांना बरोबर घेऊन सोमाटे फाटा येथील एक तीन मजली इमारत व मिसळ सेंटरवर कारवाई केली. या कारवाईसाठी तीन पोकलेन, जेसीबीच्या साहायाने अतिक्रमण हटाविण्यात आले. हिंजवडी, माण, मारुंजी या भागात पीएमआरडीएकडून मोठ्या कारवाया केल्या जात होत्या.
आज मात्र मावळ तालुक्यात कारवाई करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमाटने फाटा येथील जोगेश्वरी मिसळ सुरू करण्यात आले. मात्र पीएमआरडीएने केवळ मिसळ सेंटरवर कारवाई करत इतर इमारतींना मात्र हात न लावल्याने कारवाईबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे. एका तीन मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु इतर इमारतींना मात्र धक्का न लावता पीएमआरडीए निघून गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कारवाईबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
अर्थपूर्ती न झाल्याने कारवाई
या परिसरात अनेक ठिकाणी दोन, तीन मजली इमारती आहेत. मात्र इतर इमारतींना काहीही धक्का न लावता केवळ एक दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ आर्थिक तोडपाणी झाले नसल्यामुळेच इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.