वाघोली – वाघोली व खराडी परिसरातील विविध वयोगटातील नागरिकांसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके तसेच युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्या संयुक्त विद्यमाने “सोशल फाउंडेशन’च्या वतीने रविवारी (दि. 27 मार्च) “फॅमिली थॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खराडी येथील ईओन आयटी पार्क जवळ गेरा ग्राउंड या ठिकाणी या स्पर्धेची सुरवात होणार आहे. यात 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर असे टप्पे असणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस टी-शट, मेडल, सर्टिफिकेट, एनर्जी ड्रिंक अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, प्रथम क्रमांक पटकावण्यास विजेत्यासह एकूण पाच लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत परिसरातून आतापर्यंत हजारो नागरिकांनी नोंदणी केली असून स्पर्धेच्या दिवशीही नोंदणी स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
अनेक मान्यवर धावणार –
पुणे शहरात अशा प्रकारच्या “फॅमिली थॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत स्पर्धेस बजरंग पुनिया, डॉ. संदीप काटे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, कुस्तीपटू अभिजीत कटके, कुमारा अजवानी, सुजित महान असे अनेक नामवंत खेळाडू तसेच अभिनेते यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.