पुणे –शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी दिली.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना “महाडीबीटी’ या संकेतस्थळावर 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच 2020-21 या वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठीदेखील दि. 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली.