पुणे – कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी आणि लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कंत्राटी 199 कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
फिजिशियन, अतिदक्षता विभाग फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक असे हे कर्मचारी आहेत. याआधी 211 कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आरोग्य विभागात वर्ग 1 ते 4 च्या 1178 पदांना मान्यता आहे. परंतु सध्या 823 कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही पदे भरता येतील.
दरम्यान, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना स्थायी समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही पदे कायमस्वरूपी भरायची आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.