पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसने फिजिओथेरपी पुणे सेलची स्थापना केली आहे. नवनियुक्त प्रमुख समन्वयक म्हणून डॉ. कार्तिक गवई यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. चैतन्य सरवान यांची संघटक म्हणून नियुक्ती केली.
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत जगताप, डाॅ. सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप, पुणे डॉ. सेल अध्यक्ष डॉ. प्रशांत कदम, राज्य संघटक डॉ. राहुल सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी डॉ. सागर डोंबाळे, डॉ. अजित शेटे, डॉ. गुनेश भाटी, डॉ. पदमिणी कामठे, डॉ. माधवी कुलकर्णी यांच्यासह अनेक फिजिओेरपिस्ट उपस्थित होते.
फिजिओथेरपिस्टना प्रॅक्टिस करताना येणाऱ्या अडचणी, सरकारी नियुक्त्या, रुग्णांना अधिक चांगले उपचार यांवर काम केले जाईल, असे नवनियुक्त प्रमुख डॉ. कार्तिक गवई यांनी प्रतिपादन केले.