पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे.
ईडीच्या अधिका-यांकडून या गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले होते.
बॅंकेतील 71 कोटी 78 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.