बाळासाहेब चांदेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पौड / पिरंगुट – तळागाळातील जनतेपर्यंत पोचण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय असणे गरजे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमातून आतापर्यंत दीड कोटींपेक्षा अधिक लोकांना विविध योजनांचा लाभ झाला आहे. प्रत्येक घराघरात शिवसेना पोचवली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या चौदा महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम करत आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
पौड येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन, मुळशी तालुका अपंग कल्याण संस्थेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन उपक्रम आणि शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, किरण साळी, प्रमोद भानगिरे, संतोष तोंडे, दीपक करंजावणे, भाऊसाहेब चौधरी, इरफान सय्यद, राजाभाऊ भिलारे, कांताबाई पांढरे, सविता कुंभार, आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. मुळशीतही सहकार्य आणि सहाय्य देण्याचे काम बाळासाहेब चांदेरे करीत आहेत.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे, पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, अपंग कल्याण अध्यक्ष शिवाजी भेगडे, निलेश घारे, अमोल पांगारे, निलेश निगडे, सुनील शेंडकर, जाधव, सविता कुंभार, विकास खैरे, मंदार घुले, अमोल धनवे, नारायण चांदेरे, पप्पू चांदेरे, कुंडलिक हुलावळे, व मुळशीतील नागरिक, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील तापकीर यांनी केले.
चांदेरे यांच्या मागण्या
* चांदणी चौक – पौड – दिघी बंदर रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करून गती द्यावी.
* मुळशी धरणग्रस्तांचे 100 वर्षांपासून असलेले प्रश्न सोडवले नाही, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.
* मुळशी अपंग कल्याण संस्थेसाठी लागणारी पाच एकर जागेचा प्रस्ताव शासन दरबारी असून तिला मंजुरी मिळावी.
* मुळशी ग्रामीण आणि शहरी भागासाठी नागरिकांसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून मिळावी अशा विविध मागण्या यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी केल्या.
दहा वर्षे पंचायत समितीत काम करत असताना जनतेचे प्रश्न सोडवले. आगामी काळात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देखील प्रश्न सोडविले जातील. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण क्षमतेने पार पाडली जाईल. शासनाच्या माध्यमातून अपंग कल्याण संस्थेसाठी पाच एकर जागा उपलब्ध करून दिली तर जिल्ह्यातील अपंग बांधवांचा प्रश्न सुटेल.
-बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना