शिरूर पोलिसांची कारवाई ; चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत
सविंदणे – शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित करून संशयित दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकदे ५ चोरीच्या मोटार सायकल मिळाल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरुर पोलीस स्टेशन यांनी मोबाईल चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी शिरीष सोपान जाधव (वय १९, रा. होलार आळी, शिरुर) व संतोष मारुती ढोबळे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरुर) यांच्याकडे मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने कसून तपास केला असता त्यांनी रांजणगाव एमआयडीसी तसेच
पारनेर या भागतून चार मोटारसायकल व होंडा कंपनीची एक मोटार सायकल, अशा एकूण पाच मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पाचही मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, हवलदार प्रवीण सांगळे, पोलीस नाईक नाथासाहेब जगताप, पोलीस शिपाई रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली. शिरूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.