संशोधन अभ्यासासाठी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वेमध्ये निवड
जुन्नर – जुन्नर तालुक्याची मान उंचविणारी कौतुकास्पद गगनभरारी कामगिरी दुर्गम आदिवासी भागातील हातवीज येथील सोमनाथ निर्मळ यांनी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक संकटांवर मात करीत सोमनाथने नॉर्वे (युरोप) देशापर्यंत मजल मारली आहे.
सध्या सोमनाथ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण : धोरणे व साह्याकारी व्यवस्था’ या विषयावर पीएचडी करत आहे. नुकतेच इंटरनॅशनल विसीटिंग फेलोशिप (खपींशीपरींळेपरश्र तळीळींळपस ऋशश्रश्रुीेहळ)अिंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे (णपर्ळींशीीळीूं ेष र्डीीेंह एरीींशीप छीुेरू (णडछ) येथील संशोधन अभ्यासासाठी सोमनाथची निवड झाली आहे. येत्या 10 ऑगस्टला सोमनाथ नॉर्वे (युरोप) साठी रवाना होणार असून तीन महिने तो तेथे उहळश्रवहेव, ुशश्रषरीश रपव र्लीर्श्रीीींश या कोर्सचे शिक्षण घेणार आहे.
सोमनाथने दहावीमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, सोनावळे येथे प्रथम क्रमांक मिळविला. यानंतर श्री शिव छत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेत पुढील शिक्षणास सुरुवात केली. येथेच त्याची ओळख स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेशी झाली आणि सोमनाथच्या आयुष्यात सामाजिक जाणीवांची सुरुवात झाली. फी वाढ विरोधी विविध आंदोलने, वसतिगृहाच्या प्रश्नांवर आंदोलने, दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन हे करत सोमनाथने बारावीमध्ये कला शाखेत तृतीय क्रमांक मिळाला.
एवढेच नव्हे तर एनएसएसमध्ये बेस्ट स्टुडंट्स अवार्ड, तसेच पदव्युत्तर पदवी घेत प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी “सेट’ ही पात्रता परिक्षा उत्तीर्ण होऊन नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल ट्राईब स्टुडंटस (छऋडढ) मिळवत सध्या पीएचडी करत आहे. सध्या सोमनाथ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा केंद्रीय समिती सदस्य व राज्य उपाध्यक्ष आहे. सोमनाथचे वडील गोविंद निर्मळ, आई आनाबाई निर्मळ यांना अतिव आनंद झाला आहे. सोमनाथच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर समाजातल्या सर्वच घटकांतून अभिनंदन केले जात आहे.
कदाचित पहिलाच विद्यार्थी
जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत एवढी मोठी झेप घेणारा सोमनाथ कदाचित पहिलाच विद्यार्थी असेल.