चालकाने प्रसंगावधान राखल्याने होणारे ; मोठा अपघात टळला
मंचर – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे चालत्या ट्रॅक्टरचे पुढील बाजूचे चाक निखळले. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखल्याने होणारे अपघात टळला. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी दहा वाजता घडली.
ट्रॅक्टर (एमएच 11 जी 853) मंचरकडे दुरुस्तीसाठी नेण्यात येत होता. यावर चालक गौतम बिहार होते. दरम्यान त्याचवेळी विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालक येत होता. त्याच्यामागे एक कार होती. मोटर सायकल चालकाने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ट्रॅक्टर खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या गायमुख (ता. आंबेगाव) येथे कार्यालय असलेल्या खासगी ठेकेदाराचा असल्याची माहिती समजली आहे. ही घखना घडल्यानंतर बाळासाहेब गावडे, शैलेश भोर येथे आले आणि अन्य वाहनांना बाजूने रस्ता करून दिला. घाबरलेल्या ट्रॅक्टर चालकालाही धीर दिला.