किमान उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हतबल
लोणी देवकर – ऐन सणासुदीच्या काळात आणि दसऱ्याच्या तोंडावर झेंडूचे दर कोसळल्याने झेंडू उत्पादक शेतकरी कमालीचा निराश झाला आहे.
यंदा पावसाने दगा फटका दिल्याने अगोदरच शेतीचे गणित कोलमडले होते त्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या तोंडावर झेंडूला किमान चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी होता; परंतु सध्या इंदापूर तालुक्यात झेंडू तोडणी सुरू असून, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 25 ते 40 किलो असा दर मिळत आल्याचे चित्र आहे.
पिवळा आणि भगवा झेंडू सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने झेंडूचे दर घटल्याचे फुल विक्रेते राज गोसावी यांनी सांगितले.तर लागवडीचा खर्च, त्याचा फवारणी खर्च ,मशागत आणि मजुरी हा खर्च वजा जाता यंदा झेंडूमध्ये तोटा सहन करावा लागत आल्याचे पळसदेव येथील शेतकरी अतुल काळे यांनी सांगितले.
सध्याचे दुष्काळ परिस्थिती औषधे फवारणीचे वाढलेले दर मजुरांची वाढलेले दर याचा विचार करता शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान बाजारभाव मिळावा बाजारभाव मिळावा एवढीच अपेक्षा सध्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.