वालचंदनगर – इंदापूर येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ तालुक्यात बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार कळंब, वालचंदनगर आणि निमसाखर सह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
सुरुवातीला निमसाखर (ता. इंदापूर) येथे दुपारनंतर परिसरातील ओबीसी समाजातील कार्यकर्ते एकत्र आले. निमसाखर मध्ये लोकांची अडचण लक्षात घेत आठवडा बाजार असताना देखील बंदमध्ये घेतले नाही.
वालचंदनगर व कळंब भागातही ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या आवाहना प्रमाणे मेडिकल, दवाखाने ही अत्यावश्यक सेवा वगळुन तिन्ही गावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर येथील रणजित कारंडे, गणेश लवटे, अक्षय महानवर, किरण लवटे, आण्णा कारंडे, गणेश सातपुते, तुकेल मुलाणी, मयुर सातपुते, सचिन लवटे, पार्थ लवटे नंदु कारंडे, आभिषेक सातपुते, वाहीद मुलाणी, सागर कोरंडे, निखिल मिसाळ, मयुर वावरे सह अनेक वालचंदनगर, कळंब भागातील ओबीसी बांधवांनी बंद साठी आवाहन करण्यात आले.