बारामती -सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी बारामती तालुक्यात धूमशान होण्याचे संकेत आहेत.
खुला सर्वसाधारण गटात बऱ्हाणपूर , ढाकाळे, मोडवे, दंडवाडी, माळेगाव खुर्द, घाडगेवाडी, खंडोबाचीवाडी, मेखळी, सांगवी, शिरष्णे, तरडोली, वढाणे, झारगडवाडी, पाहुणेवाडी, जळगाव क. प, मासाळवाडी, चौधरवाडी, वाघळवाडी, मानप्पावस्ती, मेडद, सायबांचीवाडी, सुपा, जराडवाडी, चांदगुडेवाडी, सोनवडी सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, जोगवडी, लाटे या गावांचा समावेश आहेत.
यातील अनेक गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्यामुळे रंगतदार आणि चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत. या गावांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.
सरपंचपद सर्वसाधारण स्त्री प्रवर्गमध्ये भोंडवेवाडी, शिर्सुफळ, पाणसरेवाडी, मगरवाडी, आंबी बुद्रुक, पवईमाळ, करंजेपूल, गाडीखेल, पळशीवाडी, मोरगाव, कुरणेवाडी, सोनकसवाडी, मोराळवाडी, माळेगाव बु., सोनगाव, माळवाडी लोणी, खांडज, सदोबाचीवाडी, माळवाडी लाटे, उंडवडी क. प, वाणेवाडी, देऊळगाव रसाळ, चोपडज, आंबी खुर्द, अंजनगाव, जळगाव सुपे, काळखैरेवाडी, उडवंडी सुपे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये खुल्या गटातील महिला गावगाडा हाकणार आहेत.