वाघोली ः शांताराम कटके यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
वाघोली – वाघोलीचे सुपूत्र, माजी उपसरपंच शांताराम बाप्पू कटके यांचा वाढदिवस वाघोली आणि खराडी परिसरातमोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक प्रदीप वळसे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
शांताराम बाप्पू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव, रक्तदान शिबिर, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर आणि महिला भगिनींसाठी एकदिवसीय मेहंदी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाघोली येथे झालेल्या कीर्तन महोत्सवास वाघोली व खराडी परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दाखविला. रक्तदान शिबिरात तब्बल 172 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, महिला भगिनींना मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचे वाघोली आणि परिसरात कौतुक होत असून स्थानिक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत आभार व्यक्त केले.
“माझ्या वाढदिवसानिमित्त गेली अनेक दिवस कीर्तन महोत्सव, विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले. कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून संतांच्या सुश्रुत वाणीतून समाजाचे प्रबोधन व्हावे, हाच प्रामाणिक प्रयत्न मित्र परिवाराचा होता. आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.” -शांताराम कटके, माजी उपसरपंच वाघोली