पिरंगुट – सुतारवाडी (ता. मुळशी) येथील सतीश पांडुरंग सुतार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया संघटनेच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
राष्ट्रवादीमध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुळशीत एक उत्तम सोशल मीडियाचे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.
राष्ट्रवादी पक्षात सोशल मीडियामध्ये काम करण्यात ते आघाडीवर आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस व बारामती लोकसभा अध्यक्षपदावरही काम केले आहे.
खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या विचारसरणीला अनुसरून काम करत राहणार असून यापुढे पक्षाची बाजू मांडण्यात सोशल मीडियावर यापुढे अधिक सक्रिय होणार असल्याचे सतीश सुतार यांनी सांगितले.