पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडून सन्मान
शिक्रापूर – शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार रवीकिरण जाधव यांच्या नव्याने झालेल्या बढतीबद्दल त्यांचा नुकतेच पोलीस अधीक्षक अंकित गोयल व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
रवीकिरण जाधव यांची यापूर्वी असलेल्या पोलीस नाईक या हुद्यातून नुकतीच पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रवीकिरण जाधव यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली असताना काही आरोपींना त्यांनी परराज्यात जाऊन जेरबंद केले आहे.
सध्या नुकतीच त्यांची बढती झाल्याने सन्मान करत पोलिस हवालदार पदोन्नतीची फित बहाल करत पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस हवालदार संतोष शिंदे यांचा देखील सन्मान करण्यात आला असून याप्रसंगी शिक्रापूरचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव एमआयडीसीचे निरीक्षक महेश ढवाण, शिरूरचे निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते. तर याबाबत बोलताना बढती बाबतची फीत पोलीस अधीक्षकांच्या हस्ते वर्दी व खांद्यावर लागणे ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
-रवीकिरण जाधव, पोलीस हवालदार