अपघात विमा एकवरून दोन लाखांवर
राजगुरूनगर – आजमितीस राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या 1480 कोटींच्या ठेवी व 828 कोटींची कर्जे मिळून 2308 कोटींचा व्यवसाय आहे. येत्या वर्षासाठी बॅंकेने 2470 कोटींचे उद्दीष्ट ठेवले आहे. सर्वांच्या सहकार्याने ते त्यापुढेही 2500 कोटींपर्यंत जाईल, असा विश्वास वाटतो. बॅंकेच्या संचालक मंडळाने दीर्घकालीन दृष्टीकोन व्यवसाय मॉडेलचा स्वीकार केला. बॅंकेच्या सभासदांचा अपघात विमा एक लाखावरून 2 लाख रुपये केल्याची घोषणा राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केली.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेची 92 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (दि. 24) बॅंकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली राजगुरूनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घातल्यानंतर बॅंकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या मनोगतानंतर कामकाज सुरू झाले.
यावेळी उपाध्यक्ष अविनाश कहाणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, गणेश थिगळे, अरुण थिगळे ऍड. राहुल तांबे, सागर पाटोळे, विजय डोळस, अश्विनी पाचारणे, रामदास धनवटे, विनायक घुमटकर, समीर आहेर, दत्ता भेगडे, तज्ज्ञ संचालक ऍडज धर्मेंद्र खांडरे, सुरेश कौदरे, दीपक वारुळे, गौतम कोतवाल, महेश शेवकरी, प्रशांत गदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर, सम्राट सुपेकर, अंकुश कोहिनकर, दिलीप मलघे, बाळासाहेब घोलप, मंजित महिंद्रकर उपस्थित होते.
सभासदाच्या वतीने ऍड. महादेव घुले, बाबा राक्षे, हिरामण सातकर, खंडू थिगळे, निलेश आंधळे, कोंडीभाऊ टाकळकर, सतीश चांभारे, श्री भागवत, मारुती सातकर, प्रकाश पाचारणे, अविनाश कोहिनकर, सतीश नाईकरे आदींनी सहभाग घेतला.
सभासदांच्या प्रश्नांचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी वाकचौरे यांनी निरसन केले. सर्व विषय सर्वानुमते मंजूर केले. आभार उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी मानले.
मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर
शेतकऱ्यांसाठी नव्या योजना कमी व्याजदरात सुरू केल्या आहेत. शैक्षणिक कर्जासह घर कर्ज घर दुरुस्तीसाठी कर्ज आदी योजना सुरू केल्या आहेत सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला आहे. बॅंक ग्राहकांसाठी आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. थकीत कर्जाची वसुली नियमानुसार सुरू आहे. कर्जदारांनी बॅंक कर्ज हप्ते व थकीत कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केले आहे.
या विषयांवर चर्चा
* लहान कर्जाला प्राध्यान्य
* बॅंकेची वसुली, वसुली एजन्सी बंद करावी
* 15 टक्के लाभांश मिळावा
* दोष दुरुस्ती अहवाल वाचन करावे
* नफा वाटणी वैधानिक लेखापरीक्षण एक रकमी कर्ज परतफेड
बॅंकेचा आलेख-
* बॅंक सभासद संख्या : 35 हजार 800
* भागभांडवल : 60 कोटी
* स्वनिधी : 220 कोटी
* ठेवी : 1400 कोटी
* कर्जवाटप : 800 कोटी
* निव्वळ नफा : 8 कोटी
* निव्वळ थकबाकी प्रमाण : 1. 55 टक्के