पेठ – पेठ (ता. आंबेगाव) येथील राम मंदिरात आयोध्या राम मंदिर सोहळ्याप्रित्यर्थ भव्य पुरुष सुक्तानी अभिषेकास सुरुवात झाली. परशुराम सेवा संघ, आंबेगाव आणि राजगुरुनगर येथील १४ श्रीराम मंदिरांमध्ये पुरुषसुक्ताने अभिषेक होणार आहे.
२२ तारखेच्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दोन्ही तालुक्यांतील श्रीराम मंदिरांमध्ये भव्य होम करणार आहे.
यावेळी या संघाचे आठ पौरोहित्य आणि प्रखर हिंदुत्ववादी उमेश कंधारे, हिंदुजनजागृती समितीचे गणेश नवले हे उपस्थित होते.
राजगुरुनगर, बिरदवडी, पाबळ, पेठ या चार गावांमध्ये ठिकाणी अभिषेक झाले असून, 22 जानेवारीला राजगुरुनगर येथील मोती चौकात भारत माता व्यासपीठावरश्रीराम यज्ञाने संकल्पची सांगता करण्यात येणार असल्याचे असे संघाचे प्रतिनिधी रवींद्र पेठकर आणि नीलेश गोडबोले यांनी सांगितले.