आठ दिवसांत दर कोसळल्याने बळीराचे लाखोंचे नुकसान
ओतूर – जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओतूर उपबाजारात उच्च प्रतीचा कांदा सरासरी 20 ते 23 रूपये प्रती किलो विक्री होणारा कांदा आठ दिवसांतच 12 ते 15 रूपये किलोवर घसरल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने कांद्याला हमीभाव जाहिर करावा अशी मागणी सातत्याने कांदाउत्पादक शेतकर्याकडून होत आहे.
जुन्नर कृषीउत्पन्न बाजार समितीकडून जुन्नर तालुक्यातील कांदाउत्पादक शेतकर्याची गैरसोय टाळण्यासाठी ओतूर, आळेफाट व जुन्नर येथे बाजार समितीकडून कांदा लिलाव होता. त्या ओतूर व जुन्नर येथे प्रत्येक गुरूवार व रविवारी कांदा लिलाव होतात.
दरम्यान, आळेफाटा येथे मंगळवार, शुक्रवार व रविवारी कांदा लिलाव केले जातात. ओतूर, आळेफाटा उपबाजारात रविवार (दि. 10) ते रविवार (दि. 17) दरम्यान 2 लाख 12 हजार 337 कांदा पिशवीची आवक झाली.