पिरंगुट – नांदे (ता. मुळशी) येथील सरपंच निकिता चंद्रशेखर रानवडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार, सुनील शेळके, कृष्णा गजबे तसेच सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व राज्यातील सरपंच उपस्थित होते. हा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. मिळालेला पुरस्कार मला नसून माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी व आमच्या ग्रामस्थांचा आहे.
सर्व ग्रामस्थ आणि सदस्य यांनी सहकार्य केल्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. सर्वांच्या सहकार्याने भविष्यात नांदे गाव आदर्श गाव करू, असे सरपंच निकिता चंद्रशेखर रानवडे यांनी सांगितले.