पूर्व वळसे पाटील : सहकारमंत्री वळसेंच्या माध्यमातोन त्या दूर करणार
पॉईंटर : चार संगणक व एक प्रिंटर सुपूर्त
मंचर – मंचर एसटी आगार सुरू झाले असून आगारात अनेक समस्या आहेत. येथील कर्मचारी कठीण काळातही काम करत असून एसटी आगाराच्या समस्या सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवू व त्यांच्या माध्यमातून समस्या दूर करू, असे आश्वासन युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील यांनी दिले आहे.
आंबेगाव तालुक्यात नुकत्याच सुरू झालेल्या मंचर एसटी आगारास देवेंद्र शहा फाउंडेशन व रजनी प्रकाश शहा फाउंडेशन यांच्यावतीने चार संगणक व एक प्रिंटर पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी उपसभापती संतोष भोर,
तांबडेमळ्याच्या सरपंच प्राजक्ता तांबडे, मंचर एसटी आगाराचे व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी, देवेंद्र शहा फाउंडेशनचे अध्यक्ष नीलकंठ काळे, नवनाथ निघोट, गौरव भोर, विलास तांबडे, विकास भोर, लक्ष्मण थोरात, शिवाजी तांबडे, संतोष माशेरे, राहुल लोंढे, गणेश थोरात, गंगा पानसरे, राहुल खेमनार, अनिरुद्ध थोरात व एसटी कर्मचारी व तांबडेमळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली असून शहरा शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू झाल्या आहेत. भविष्यात पेट्रोल डीझेलवर चालणारी वाहने बंद होणार असून मंचर एसटी आगारालाही इलेक्ट्रिक बस मिळाव्यात. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. वळसे पाटील यांनी तर सरपंच प्राजक्ता तांबडे यांनी आभार मानले.
मंचर एसटी बस आगारात सध्या अनेक प्रकारच्या त्रुटी असून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून या सर्व त्रुटी भरून काढल्या जातील व मंचर आगार राज्यात एक नंबरचे आगार होईल .या ठिकाणचा आदर्श इतर आगार घेऊन जातील.
– देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद सहकारी बँक