नांदूर -नांदूर (ता. दौंड) येथील कोतिमाळ वस्ती व इतरत्र वाड्या-वस्त्यांवर बिबट्याने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले असून, शेतात काम करणेसुद्धा आवघड झाले आहे. या पसिरात एक वासरू, दोन कुत्री आणि कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेण
नांदूर (ता. दौंड) परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचे दर्शन होत आहे; पण या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कोतिमाळ वस्ती या परिसरात ऊस जास्त असल्याने बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे, त्यामुळे सध्या या परिसरामध्ये बिबट्या सातत्याने दिसत असून,
बिबट्यांना पकडण्याची मागणी, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सुनील बोराटे, माजी सरपंच पोपटराव बोराटे, युवा नेते रामदास बोराटे, भानुदास बोराटे, सखाराम बोराटे, दत्ता बोराटे, प्रभाकर म्हेत्रे यांनी केली आहे. परिसरात रात्री-अपरात्री बिबटे दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भागात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे; त्याप्रमाणे या भागात तातडीने बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.