नाशिक येथे मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते सन्मानित
पॉईंटर : खेडमधील खरोशी गावचे नाव केले उज्ज्वल
राजगुरूनगर – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंचावर घोडेगाव आदिवासी विकास प्रकाल्पातंर्गत यंदाचा आदिवासी समाजासाठी योगदान देणार्या आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांना शासनाचा आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासी समाजसेवक या पुरस्काराने गौरविण्यात आले. खेड तालुक्यातील खरोशी येथील समाजसेवक माजी सरपंच तुळशीराम रुपाजी लांघी यांना यावर्षीचा पुरस्कार देण्यात आला.
खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डेहणे परिसरातील खरोशी येथील समाजसेवक माजी सरपंच लांघी यांना आदिवासी समाजसेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते 25 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासना मार्फत आदिवासी समाजसेवक आणि संस्था यांना अनुक्रमे आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.
हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला. याप्रसंगी आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे, घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, निरीक्षक बसवराज गुजगोंड, भोलानाथ कौदरे खरोशी गावचे सरपंच रोहिणी लांघी, उपसरपंच गोरक्ष कौदरे, प्रमोद पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य आशा कौदरे, दत्ता भोईर, शंकर लांघी, कल्पना कौदरे, सुनंदा लांघी, ग्रामविकास अधिकारी रुपाली कड, नारायण लांघी, रोहिदास कौदरे, विजय कौदरे, आशा स्वयंसेविका मनिषा कौदरे, कुंदाताई धराडे उपस्थित होते.
यांना मिळाला पुरस्कार
घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत तुळशीराम रुपाजी लांघी (खेड), सिता गणपत किरवे, सविता सहदेव मते (आंबेगाव), प्रकाश रामचंद्र वायदंडे (कराड सातारा).