जळोची – दावसमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्रा यांची भेट झाली असेल का? तसेच मायक्रोसॉफ्टमधून किती लोक गेले. याची माहिती घेतली असता ते दोन-तीन लोक गेले आहेत असे समजले. आमच्याकडून तर 47 लोकं गेले आहेत. त्यासाठी 35 कोटी रुपये खर्च झाला.
मायक्रोसॉफ्ट म्हटले, आम्ही असला खर्च करत नाही आमचे दिवाळे निघल. बाकी दावसबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत खासदारस सुप्रिया सुळे यांनी दावस दौर्यावर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. बारामतीत कृषक 2024 या जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री चेलूवरय्या स्वामी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार उपस्थित होते.
यावेळी मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्रा यांनी ऑनलाइनद्वारे दावस येथून प्रतिक्रिया व्यक्त केली. हाच धागा पकडत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सहकारी दावस दौर्यावर असणार्यांवर मिश्किल टिप्पणी केली. सुळे म्हणाले की, आज दावसला जरूर काही गोष्टी होत आहेत. दावस पेक्षा काळ्या मातीशी इमान राखणार्या शेतकर्यांसाठी दावस पेक्षा मोठं काम बारामतीत होतं. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण दावसला दरवर्षी सह्या होतात. मात्र महाराष्ट्रात त्याची इन्व्हेस्टमेंट किती होते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र बारामतीच्या कृषकमध्ये ज्या-ज्या गोष्टी होतात. त्या स्वप्न, आकांक्षा नसतात. ते वास्तव करून दाखवण्याची ताकद कृषकच्या टीम मध्ये आहे.
…ही अभिमानाची गोष्ट
जेव्हा आर्टिफिशल इंटेलिजन्स बद्दल कोणी काहीच बोलत नव्हते त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. जावकर यांच्या मदतीने देशातील पहिली ए. आय. इंटेलिजन बारामतीत सुरू झाले, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तद्नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ए. आय. इंटेलिजनच्या तीन लॅब निर्माण करण्याची घोषणा केली.