मंचर -श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेलेले हॉटेल व्यावसायिक दुंदा लोहकरे (वय 65) यांच्या डोक्यावर बांधकामाचा एक जुना सिमेंटचा खांब पडून मृत्यू झाला.
आज (दि. 9) सकाळी 6 वाजण्याचे सुमारास दुंदा भागुजी लोहकरे हे बांधकामाला पाणी मारत असलेल्या बांधकामाचा.
त्यांना रक्तबंबाळ स्थितीमध्ये तात्काळ वैदयकीय उपचारासाठी तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना तपासून पुढील उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात आणले.
घोडेगाव ग्रामीण रूग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी जखमी लोहकरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दुंदा लोहकरे हे पुणे जिल्हा बॅंकेचे माजी संचालक मारुती लोहकरे यांचे थोरले बंधू होत.