तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जिल्हा पुणे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या वतीने विष्णू गणेश पिंगळे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी सरपंच अंकिता भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, माजी सैनिक संघटना पदाधिकारी आनंदराव ढमढेरे,
श्रीरंग ढमढेरे, रामदास भुजबळ, गुलाब गवारे, जालिंदर ढमढेरे, विकास भुजबळ, चंद्रकांत लांडगे, संतोष कांचन, पोपट भुजबळ, दादा केदारी उपस्थित होते. यावेळी विष्णू गणेश पिंगळे यांची स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बँड पथकाचे संचलन करण्यात आले. क्रिडा शिक्षक किरण झुरुंगे यांनी यांनी आयोजन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शालन खेडकर यांनी आभार मानले.