मराठा, कुणबी समाजातील युवकांसाठी सारथी संस्थेचा उपक्रम
मंचर : येथे मराठा, कुणबी समाजातील युवकांसाठी सारथी संस्थेमार्फत मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती मंचर येथील ओम् इलेक्ट्रो कंप्यूटर सिस्टम व साक्षी कंप्युटर्स मंचरच्या संचालक प्रदीप लोंढे व अरुणा लोंढे यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कोर्सच्या विद्यार्थिनी वैष्णवी मेंगडे, पूर्वा वळसे, तनुजा मेंगडे, ऐश्वर्या गवारी या विद्यार्थिनी छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व सारथीच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व एमकेसीएल पुणे यांच्याद्वारे छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, राबविले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ मराठा व कुणबी समाजातील युवकांना मोफत सहा महिन्याचा संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात असून यासाठी प्रवेश प्रक्रियेस सुरु आहे.
संपूर्णपणे मोफत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 18 ते 45 वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, दहावीचा टीसी, गुणपत्रिका. रहिवासी प्रमाणपत्र, एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो या कागदपत्राची पूर्तता करून मंचर येथील साक्षी कंप्युटर्स व ओम् इलेक्ट्रॉ कंप्यूटर सिस्टम मंचर येथील कंप्यूटर्स केंद्रात सारथी अभ्यासक्रम चालविणार्या एमएससीआयटी केंद्रास भेट द्यावी व संधीचा फायदा मराठा युवकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.