संजय जगताप : सासवडला काळ्या फिती लावून आंदोलन
सासवड (प्रतिनिधी) -कोविडमध्ये अनेकदा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद पाळण्यात साथ दिली. त्यामुळे त्यांची भावना लक्षात घेऊन सण पाहून आठवडे बाजाराच्या दिवशी थेट बंद न पाळता प्रातिनिधिक स्वरूपात काळे झेंडे दाखवून व काळ्या फिती लावून सर्वांनीच भाजपचा निषेध करण्यासाठी साथ दिली.
भाजप सरकारमुळे लोकशाही अडचणीत आली आहे. ही प्रवृत्ती हुकुमशाहीच्या दिशेने जाणारी असल्याचे मत आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
सासवड नगरपालिकेचे समोर शिवतीर्थ चौकात महाआघाडी सरकारच्या घटक पक्षांनी निषेध व्यक्त करून केंद्र सरकार व भाजपविरुद्ध आंदोलन केले. यासंगी माजी आमदार अशोक टेकवडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरुंगे, शिवसेनेचे अभिजित जगताप,
डॉ. अस्मिता रणपिसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, बाळासाहेब पायगुडे, राजगौरी जगताप, दिलीप गिरमे, राहुल गिरमे, संदेश पवार, ईश्वर बागमार, योगेश फरतडे, व्यापारी पदाधिकारी संजय चव्हाण, उमेश जगताप, बंडूकाका जगताप, निलम होले, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.