पुणे जिल्हा: वाघोली येथे कोविड केअर सेंटर सुरू

आमदार अशोक पवार यांचे हस्ते उद्घाटन
वाघोली :
वाघोली (ता. हवेली) येथे पान मळ्यातील गोडाउनमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे  आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून स्वतःच्या जागेत १०० रुग्णांसाठी सोयीसुविधांसह सज्ज अशा कोविड केअर सेंटरचे उद्घाटन  शिरूर-हवेलीचे आमदार अ अशोक पवार यांचे हस्ते करण्यात आले.

हवेली तालुक्यामधील जास्तीत जास्त रुग्णांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने माजी जिल्हापरिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि. ३ मे) रोजी सकाळी शासकीय नियमांचे पालन करून आमदार अॅड. अशोक पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला.
कोविड केअर सेंटरमध्ये २१ ऑक्सिजन बेड, ४ व्हेनटीलेटर बेड तर २५ आयसोलेशनचे बेड असणार आहेत. सध्या ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच १०० बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. सुसज्ज असे हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर उभारल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. मास्क, सॅनीटायजरचा वापर करावा तसेच शासकीय नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार पवार केले.

यावेळी माजी सरपंच माणिकराव सातव पाटील, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, जि. सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी उपसरपंच मारुती गाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, वसंत काका जाधवराव, सुनील जाधवराव, माजी उपसरपंच मंदाताई जाधवराव, अनिल सातव, माजी ग्रा.पं. सदस्य दतात्रय कटके, बाळासाहेब (गवळी) सातव, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश बापू सातव, माजी उपसरपंच समीर भाडळे, ग्रा.पं. सुधीर भाडळे, सागर जाधव, बाळासाहेब शिंदे, किसन जाधव, प्रमोद भाडळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, गणेश बाळासाहेब सातव, विठ्ठल शिवरकर, संतोष तांबे, सुनील काळे, राजेंद्र भाडळे, संतोष सातव, विनायक दाभाडे, रोहिदास दाभाडे, लखन भाडळे, मच्छिंद्रनाथ दाभाडे, प्रवीण दाभाडे, स्वप्नील दाभाडे, प्रतिक तांबे,  संजीवकुमार पाटील यांचेसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत माजी जिल्हापरिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी श्री सिद्धनाथ हॉस्पिटलच्या मदतीने व वाघोली ग्रामस्थ, वाघोली हौसिंग सोसायटी व वाघोली रोटरी क्लबच्या सहकार्यातून पुणे-नगर महामार्गालगत पानमळा या ठिकाणी स्वतःच्या जागेत सर्व सुविधांसह प्रशस्त असे कोविड सेंटर उभारून एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
राजेंद्र सातव-पाटील,माजी उपसरपंच वाघोली
  

वाघोली येथे रामभाऊ दाभाडे यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमुळे निश्चितच वाघोली व परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. –
अॅड. अशोक पवार (आमदार शिरूर-हवेली)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.