शिक्रापूर – शिक्रापूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचार्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत जिल्ह्यामध्ये आदर्श असे काम केले असल्याने नुकतेच पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेताच औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी मोडीत काढून, कर्मचार्यांना मार्गदर्शन करत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिस्तूल घेऊन फिरणार्या, विद्युत रोहित्र फोडणार्या, विविध चोर्यांसह अनेक गुन्ह्यांचा छडा लावत परिसरातील महाविद्यालय व शाळा परिसरात फिरत तसेच सोशल मीडियावर दहशत माजवणार्यांच्या मुसक्या आवळून अनेक गरजूंना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
पोलीस स्टेशनचा कारभार जिल्ह्यात आदर्श असा केला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीची दखल घेऊ नुकतेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मिलिंद मोहिते यांसह आदी उपस्थित होते.