लोणी काळभोर -चोरटयांनी आयडिया कंपनीचे मोबाइल टॉवरचे रुस कार्ड व बेस बॅंन्ड असा एकूण 10 लाख रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बी फोर एस सोल्युशन प्रा. लि. पुणे कंपनीचे डेप्युटी मॅनेजर संजय चंद्रभूषण पाठक (वय 40, रा. दिघी, पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे. चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाठक यांची कंपनी इंडस टॉवर कंपनीचे सिक्युरीटी कॉन्ट्रॅक्ट घेते. टॉवर बनवून ती मोबाइल कंपन्यांना भाड्याने देते. (दि.23) ऑक्टोबर रोजी दुपारी कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणारे अविनाश कोळपे यांनी पाठक यांना फोन करून कुंजीरवाडी हद्दीतील बोरकर वस्ती येथील श्रीकांत भगवंत बोरकर यांच्या प्लॉटमध्ये असलेल्या आयडिया कंपनीच्या टॉवरमधील बीटीएस फोडून त्यातील रुस कार्ड व ब्रेस बॅन्ड हे चोरुन नेले आहे, अशी माहिती दिली. पाठक यांनी याठिकाणी जाऊन खात्री केली. त्यानंतर फिर्याद दाखल केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.