नऱ्हे गावात सागर भूमकर यांचा ग्रामस्वच्छता उपक्रम
नऱ्हे – नऱ्हे ग्रामपंचायत व भाजप ओबीसी मोर्चा-पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबिवण्यात आले. उपसरपंच सागर भूमकर यांनी स्वत: झाडू हाती घेत हा उपक्रम राबविला. त्यांच्या या कामास ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांनीही दाद देत रविवार साप्ताहिक सुट्टी असतानाही संपूर्ण दिवस गाव स्वच्छतेचे काम केले. कचरा गोळा करून संपूर्ण गाव चकाचक करण्यात आले. काही ग्रामस्थांनीही या उपक्रमाता उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
नऱ्हे गावचे उपसरपंच तथा ओबीसी मोर्चोचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर सत्यवान भूमकर यांच्या संपर्क कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब गावडे, सरपंच मीनाक्षी बाळासाहेब वनशिव, ग्रामपंचायत सदस्य चैत्राली विलास कुटे, सतीश प्रभाकर कुटे, सुशांत सुरेश कुटे, सुभाष इंगळे, अनिता देवीदास कुटे, धनश्री विजय भुमकर, सुवर्णा प्रकाश खेडेकर, स्वाती गोपीनाथ वाल्हेकर, अलका विजय कडू आदी उपस्थित होते.