पुणे – मारहाण करुन कामगारांचे 37 हजार रुपये लूटण्यात आले. ही घटना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अविनाश लल्लन जैसवाई (28,रा.बालेवाडी) हा त्याचे व त्याच्या मित्रांचे असे एकूण 37 हजार रुपये बालेवाडी फाटा येथील कोटक महिंद्रा बॅंकेत भरण्यासाठी घेऊन चालला होता.
यावेळी मागुन दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला दुचाकी आडवी लावून थांबवले. त्यातील एकाने “सकाळी तु माझ्या बहिणीच्या तोंडावर गांजा फुकला होता आता पण तुझ्या खिशामध्ये गांजा आहे’ असे म्हणून जबरदस्तीने खिशात हात घातला.
यानंतर पॅन्टच्या खिशातील रोख 37 हजाराची रक्कम जबरदस्तीने काढून घेत कानाखाली मारली. यानंतर पोलिसात तक्रार दिली तर तुला इथे काम करु देणार नाही, आम्ही येथील दादा आहोत असा दम भरला. याप्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसारग करत आहेत.