पुणे – वानवडी पोलिसांनी दोन सराईत वाहनचोरांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा पाच दुचाकींसह दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. रोशन दत्तात्रय पिसाळ (27,रा.वाघोली) व योगेश गांधी अस्वले ( रा. मांजरी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वानवडी पोलीस ठाण्यात एककरीझ्मा मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार 24 जून रोजी दाखल झाली होती. या अनुषंगाने तपास करता 26 जून रोजी पोलीस अंमलदार सुधीर सोनवणे व अमित चिव्हे यांना खबर मिळाली की, गुन्हयातील वाहन चोर रामटेकडी येथे येणार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस अंमलदार राजु रासगे, नवनाथ खताळ, दिपक भोईर व गणेश खरात यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांचेकडे असलेले करीझ्मा दुचाकी गाडीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी म्हसोबा मंदीरा जवळ काळेपडळ, येथुन चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांचेकडुन एकुण 2 लाख रुपयांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यांच्यावर वानवडी, हडपसर, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच आणखी एक मोटार सायकल जप्त करण्यात आलेली असुन तीचे बाबत तपास सुरु आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, पोलीस निरीक्षकसावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.