पुणे – विमानतळ पोलिसांनी पाठलाग करत दुचाकी चोरास जेरबंद केले. त्याच्याकडुन एक लाख रुपये किंमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. आकाश हरिश्चंद्र पायगुडे (21, रा, शिवमंदीराजवळ कलवडवस्ती, लोहगाव ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत अलीकडील काळामध्ये दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. त्या अनुषंगाने गस्त तसेच नाकाबंदी करुन चोरांचा शोध घेण्यात येत होता. तपास पथक हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना खबर मिळाली की,दुचाकी मोटार सायकल चो-या करणारा एक सराईत गुन्हेगार हा चोरीचे सी.डी डिलक्स मोटार सायकलवरुन गणराज चौक कलवडवस्ती लोहगाव पुणे येथे फिरत आहे. त्याप्रमाणे तपास पथकाने सापळा रचुन चोरीची सी.डी डिलक्स मोटार सायकल व त्यावरील दुचाकी चोरास पाठलाग करुन ताब्यात घेतले असुन आरोपीवर यापुर्वी अशाच प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत. त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करता त्याने राजगड पोलीस ठाण्याच्या हददीतील आणखी एक दुचाकी व्हेस्पा मोपेड चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक पोउपनिरी सचिन जाधव, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, गणेश साळुके, उमेश धेंडे, सचिन जाधव, प्रदिप मोटे, गिरीष नाणेकर, नाना कर्वे यांचे पथकाने केली आहे.